Friday, September 6, 2013

Visiting Ladakh - 3

दिवस चौथा - लेह

प्रचि ६१ सुप्रभात


जे पर्यटक थेट दिल्ली ते लेह असा विमान प्रवास करतात त्यांना लेहला आल्यावर acclimatization साठी १-२ दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. आम्ही श्रीनगर - कारगील - लेह असा तीन दिवसांचा प्रवास करुन लेहला पोहचलो होतो. त्यामुळे लेहच्या विरळ हवामानाशी एकरुप झालो होतो. ग्रुप मधिल काही जणांनी शक्य तितकी खबरदारी घेऊनही त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता.

प्रचि ६२


हॉटेल स्नो लायनचे आलू पराठे दाबुन बाहेर पडलो. बाहेरील जीवसृष्टी आपल्या दैनंदिनीत मग्न झाली होती.

प्रचि ६३


प्रचि ६४


प्रचि ६५


कालचा कारगील - लेह प्रवास हा उत्तर पश्चिम असा होता. तर आज लेहच्या दक्षिण परिसरातील मॉनेस्ट्री फिरणार होतो. साधारण ६० कि.मी. परिघातला प्रवास असल्याने आम्ही बिनधास होतो. गब्बर एक्स्प्रेस कालच श्रीनगरला रवाना झाली होती. आज आमचे सारथ्य करायला तिबेटियन नामखर हजर होता.

प्रचि ६६


प्रचि ६७


लेहच्या दक्षिणेला मनाली रस्तयावर शे पॅलेस, थिकसे मॉनेस्ट्री, हेमिस गोंपा, सिंधु घाट हा परिसर आहे.

प्रचि ६८


हेमिस गोंपा डोंगरांच्या गपचणीत लपलेला आहे. सिंधु नदीला ओंलाडुन आम्ही हेमिसला पोहचलो.

प्रचि ६९ हेमिस गोंपा


प्रचि ७०


प्रचि ७१


हेमिस पाहुन गाडी जवळ आलो... तेव्हढ्यात जोराचा गडगडाट झाला. इथल्या लहरी हवामानाचा अंदाज येण फार मुश्किल काम. विखुरलेल्या पब्लिकची जमावाजमव करुन अर्धा तासात थिकसे मॉनेस्ट्रीला पोहचलो.

प्रचि ७२


प्रचि ७३


प्रचि ७४


मॉनेस्ट्रीचे दरवाजे जेवणाच्या वेळी बंद असतात.

प्रचि ७५


प्रचि ७६


प्रचि ७७


प्रचि ७८


प्रचि ७९


प्रचि ८० थिकसे मॉनेस्ट्री


थिकसे मॉनेस्ट्रीत असलेल्या एकमेव उपहार गृहात थुपका ऑर्डर केला. लेह शहर सोडलं तर इतर पर्यंटन स्थळांवर खादाडीची मारामारी आहे.

परतीच्या वाटेवर थ्री इडियट मधली शाळा बघितली. गिरीने 'Silencer'चा जिथे फ्युज उडाला होता त्या जागेचा फोटो काढला. हाहा

समोर ढगफुटी सारखा नजारा दिसत होता..
प्रचि ८१


शाळे जवळ एक सुंदर मॉनेस्ट्री आहे.
प्रचि ८२


प्रचि ८३


या ओसाड प्रदेशात दुपारच्या उन सहनशक्तीचा अंत पहातो. चारच्या सुमारास परत शहरात आलो आणि आमचा मोर्चा 'हॉल ऑफ फेम' या भारतीय सैन्यदलाच्या संग्राहलया कडे वळवला.

प्रचि ८४


प्रचि ८५


परतीच्या वाटेवर शांती स्तुपाचे दर्शन घडले
प्रचि ८६


संध्याकाळी विंडो शॉपिंग करुन हॉटेल गाठले तेव्हा हॉटेलच्या गच्चीवरुन मावळतीचा सुंदर नजारा दिसत होता.
प्रचि ८७

 

No comments:

Post a Comment