Monday, January 19, 2015

पुन्हा एकदा शाळेत!!!

'शाळाऽऽ' प्रत्येकाच्या मनातला एक अनमोल कप्पा.. आयुष्याच्या वाटचालीतील एक सुंदर तप.. या देवळाचा उंबरठा ओलांडलेला हर एक विद्यार्थी 'ही माझी शाळा' अशी ओळख सांगताना अभिमानाने खुलुन जातो. मिलिंद बोकिलांची 'शाळा' जगलेले लाखो रसिक आज ही गत आठवणीं मधे हरवुन जातात... आज तीच पात्र, तीच शाळा आणि तोच क्षण जगण्या करता हजारो विद्यार्थी पुन्हा एकदा आर् एम् भट हायस्कुल मधे जमले ते 'पुन्हा एकदा शाळेत' या हाके दाखल... आपल्यातील संवेदनशील, खोडकर, दंगाखोर, हजरजबाबी विद्यार्थाला वाट करुन देण्यासाठीच.. १९४५ पासून ते २०१४ पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्याना एकत्र आणण्याचे काम केले ते शाळेच्याच माजी विद्यार्थ्यांनी आणि त्यांना मोलाची साथ लाभली ती शाळेच्याच आजी माजी शिक्षकांची. निमित्त होते २०१८ मधे साजरी होणारी शाळेची 'शताब्दी'.
सरस्वती वंदन
इयत्ता: १ली ते ४थी / तुकडी: अ
सणवारांचा महिमा
चित्रकलेचे धडे इथेच गिरवले गेले...
प्रयोगशाळा
शाळेची ईमारत
चौक
Batchmates
NCC Parade
मधली सुट्टी
हप्तावाटप
तंगडीखेच
वर्गमैत्री
गृहपाठ
Vision 2018