Wednesday, November 21, 2012

हैद्राबाद आणि श्रीशैलम्


'हुसेन सागर' तलावाच्या भवताली वसलेले, आंध्र प्रदेशची राजधानी असलेले शहर 'हैद्राबाद'.

प्रकाशचित्र १

प्रकाशचित्र २


महम्मद कुली कुतूब शहाने १५९१ मधे शहराच्या मध्यभागी साधारण ५० मि. उंचीची 'चारमिनार' इमारत उभी केली.
प्रकाशचित्र ३


प्रकाशचित्र ४


प्रकाशचित्र ५


चार मिनारच्या दक्षिण टोकाला मक्का मस्जिद दिसते.
प्रकाशचित्र ६


चारमिनार जवळच मोती, रंगीत बांगड्या, कपडे, चप्पल इ. खरेदीसाठी प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे 'लाड बाजार'.
प्रकाशचित्र ७


प्रकाशचित्र ८ Lumini Park


प्रकाशचित्र ९


प्रकाशचित्र १० Amphi Theater - Sound & Light Show


प्रकाशचित्र ११


प्रकाशचित्र १२ NTR Garden


प्रकाशचित्र १३


प्रकाशचित्र १४


प्रकाशचित्र १५


प्रकाशचित्र १६ सचिवालय


श्रीशैलम्

हैद्राबाद पासून सुमारे २१० कि.मी. वर पुर्वे कडे नल्लामलाईच्या डोंगर रांगात वसलेले श्री मल्लिकार्जुन यांचे प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. समुद्र सपाटी पासून ४७६ मि. उंचीवरील या सदाहरित जंगलातील कृष्णा नदिचं उगम स्थान हे श्रीशैलमचे प्रमुख आर्कषण. कृष्णा नदी पुढे नागार्जुन सागर जलाशयाला मिळते त्या आधीचा तिचा प्रवास केवळ नयनरम्य आहे. नदीच्या दोन्ही तिरावरील विविध जिवसृष्टी आपले मन मोहवून टाकते.

महाकाली मंदिरात तपस्या करत असलेल्या नंदी वर प्रसन्न होउन मल्लीकार्जुन आणि ब्रम्हरंभा रुपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. श्रीशैलमचा इतिहास आपल्याला सातवाहन काळा पर्यंत मागे घेऊन जातो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा रेड्डीने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा पायरी मार्ग बांधला. विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे निर्माण कार्य करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात कृष्णदेवराय यांनी पुर्वे कडे राजगोपुर आणि सलुमंतापस आदींचे निर्माण कार्य केले. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विज मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले.

१२ ज्योतिर्लींगां पैकी एक ठिकाण असल्याने इथे वर्षभरात महाशिवरात्री ब्रम्होत्सव, तेलगु नववर्षाचा उगडी सण, दसरा, कुंभोत्सवम, संक्रांती, कार्तीकामोहोत्सव असे अनेक सण साजरे केले जातात.

श्रीशैलम् मंदिर समिती तर्फे बांधलेल्या धर्मशाळेत मुक्कामाची उत्तम सोय होते. स्वच्छतेच्या बाबतीत इतर तिर्थक्षेत्रां पेक्षा वरच्या स्थानावर आहे. मंदिर परिसरात कॅमेरा वापरावर पुर्णपणे बंदी आहे.

प्रकाशचित्र १७


प्रकाशचित्र १८


प्रकाशचित्र १९ श्रीशैलम धरण


प्रकाशचित्र २०


प्रकाशचित्र २१ कृष्णा नदी


प्रकाशचित्र २२


प्रकाशचित्र २३


प्रकाशचित्र २४


प्रकाशचित्र २५


प्रकाशचित्र २६


प्रकाशचित्र २७


प्रकाशचित्र २८


प्रकाशचित्र २९


प्रकाशचित्र ३०


प्रकाशचित्र ३१


प्रकाशचित्र ३२


प्रकाशचित्र ३३