Tuesday, September 10, 2013

Visiting Ladakh - 4

दिवस पाचवा ६ ऑगस्ट मंगळवार - (Highest Motorable Raod, 18350 FT) खांदुर्गला मार्गे नुब्रा व्हॅलीला निघालो.

प्रचि ८८


खांदुर्गला विषयी मनात फार उत्सुकता होती. तेथील विरळ हवा, उणे तापमान, अकस्मात कोसळणार्‍या दरडी, हिमनग आणि सगळ्यात भयानक म्हणजे तो खांदुर्गलाचा अरुंद रस्ता...

प्रचि ८९


प्रचि ९०


लेहच्या उत्तरेला सियाचीनला जोडणार्‍या रस्त्यावरिल खांदुर्गला ही जगातील सर्वात उंची वरील खिंड... शहरातून बाहेर पडले की लगेच चढ सुरु होतो. साधारण एक दिड तासात खांदुर्गलाचा साऊथ पुल्लू (आर्मीचा पहिला चेक पोस्ट) लागतो. भारताच्या या भागात जाण्यासाठी लेह मधुन रितसर परवानगी (Inner Line Permit) घ्यावी लागते. हे Permitचे काम आमच्या टुर ऑपरेटरने करुन ठेवले होते. साउथ पुल्लू वरुन दिसणारा नजारा.

प्रचि ९१


साउथ पुल्लू नंतरचा भयाण रस्ता पोटात गोळा आणत होता.

प्रचि ९२


प्रचि ९३


जसजसे वर जात होतो तसतसे ट्रॅफिकची घनता वाढत होती. इतर वेळी वाटेल तसे Over Taking करणारे बहाद्दर इथे मात्र Horn OK Please ची री ओढताना दिसत होते. फिदीफिदी

प्रचि ९४


प्रचि ९५  खां दु र्ग ला


प्रचि ९६ खांदुर्गला वरुन दिसणारी उत्तरे कडील काराकोरम पर्वत रांग


प्रचि ९७


खांदुर्गला पार करुन खाल्सरच्या दिशेने निघालो. वाटल होत की खांदुर्गंचा नॉर्थ पुल्लू पार केल्यावर रस्ता चांगला असेल. पण कसल काय... वितळाणार्‍या हिमनगांनी पुढच्या रस्त्यात २-३ फुटांची पाण्याची डबकी निर्माण केरुन ठेवली होती. खाल्सरला जेवण करुन पुढे नुब्रा व्हॅली कडे निघालो.

प्रचि ९८


प्रचि ९९


प्रचि १००


प्रचि १०१


उत्तर ध्रुवा नंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाच थंड हवेचा प्रदेश म्हणजे कारोकोरम पर्वत रांग. या काराकोरम पर्वतसरीच्या मुखातून श्योक नदी उगम पावते. उत्तर पश्चिम असा प्रवास करणार्‍या श्योक नदीच्या उत्तर तीरावर पसरलेली आहे नुब्रा व्हॅली!

प्रचि १०२


या व्हॅलीतून उत्तरेला गेलेला रस्ता पार सियाचीन बेसकँप पर्यंत जातो... तर पश्चिमेला जाणारा रस्ता तुरतुक पर्यत जातो. आम्ही तुरतुकच्या मार्गाने डिस्कीटला पोहचलो. मुक्कामाच हॉटेल अगदी आटोपशीर होतं.

प्रचि १०३


हॉटेल वर थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही हंडरला कॅमल सफारी साठी निघालो.

प्रचि १०४


वाटेत श्योक नदीच्या दोन्ही तीरावरील अद्भुत डोंगर रांगाची मालिका लक्ष वेधुन घेते होती. तिरप्या कोनात नदित उतरणारे डोंगर जणू काही घसरगुंडीला आव्हान देत होते. डोंगारा वरुन घरंगळत उतरणार्‍या वाळूने आणि सतत वाहत्या वार्‍या मुळे येथे नदी किनार्‍यावर वाळुच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत.

प्रचि १०५


या वाळुच्या टेकडयांवर Double Humpd Camel ची एक दुर्मिळ प्रजाती पहावयास मिळाली. येथील Camel Safariतून फेरफटका मारताना खूप धम्माल आली. पाच सहा उंटाच्या समूहला सगळ्यात पहिल्या उंटाच्या मागे असे एका रांगेत बांधतात आणि देतात सोडून... मग काय या रेल गाडीतल्या उंटाचे तोंड पुढे बसलेल्या सफारीच्या पायांना घासले की एकच कल्ला व्हायचा. फिदीफिदी

प्रचि १०६


नुब्रा व्हॅलीतही थंडीने आमचा अपेक्षा भंग केला. खास थंडीसाठी लेहला स्वेटर खरेदी केली होती.
दुसर्‍या दिवशी लेहला निघण्यापुर्वी डिस्कीटच्या १४व्या शतकात स्थापलेल्या मॉनेस्ट्रीला भेट देण्यास निघालो. मैत्रेय बुद्धाची आवाढव्य मुर्ती पाहताना भान हरपून जाते.

प्रचि १०७


प्रचि १०८


प्रचि १०९


परतीच्या मार्गात श्योक नदीचा पात्रातून जाणार्‍या रस्त्यावर इंद्रवज्रची किमया अनुभवास मिळाली.

प्रचि ११०


नॉर्थ पुल्लू, खांदुर्गला, साउथ पुल्लू असा खडतर प्रवास करत हॉटेल वर परतलो तेव्हा दुपार उलटून गेली होती.

No comments:

Post a Comment