Wednesday, May 21, 2014

खांदेरी - उंदेरी

तीन ऋतूत तीन ट्रेक हा जणू पायंडाच पडला आहे. यंदाच्या मोसमाला सुरवात झाली ती पावसाळ्यातील गोप्याघाट ते मढेघाटाने.. हिवाळ्यातील भ्रमंती अविस्मरणिय केला ती बागलाण प्रांतातील साल्हेर-सालोटा,मुल्हेर-मोरा या गिरिदुर्गांनी... यंदाच्या मोसमाचा शेवट जलदुर्गांने करायचा म्हणुन बहुप्रतिक्षीत खांदेरी -उंदेरी या जलदुर्गांची निवड करण्यात आली.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही जोडगोळी आम्हाला साद घालत होती. उन्हाळी ट्रेकसाठी अलिबाग जवळील या दोन किल्ल्यांना भेट देणाचा मनसुबा सर्वांनुमते पास झाला.
रविवार असुनही १८ मेच्या सकाळी सात वाजता एकून आठ मावळे आपल्या तीन चिमरुड्यां सोबत Gate Way of India वरुन थळकडे निघाले. खांदेरी साठी थळच्या फिश मार्केटमधुन लहान मोटर बोटी सुटतात. थळ पासून उंदेरी किल्ला जवळ असला, तरी बोट उभी करण्यासाठी धक्का नसल्याने तिथे जाता आले नाही. उंदेरीच्या पुढे खोल समुद्रात दिड कि.मी. वर खांदेरी किल्ला आहे. बोटवाल्याने रु.३०००/- च्या बोलीवर फक्त खांदेरीचे दर्शन घडवले. सागरी किल्ला असल्याने किल्ल्याचा पसारा फारसा नाही. पडझड झालेले बुरुज, गाड्याच्या तोफा, वेताळेश्वर, दिपगृह हे सगळे फिरुन तासाभरात परतीच्या प्रवासाला निघालो.
प्रकाशचित्र १
प्रकाशचित्र २ डावीकडे खांदेरी तर उजविकडे उंदेरी दिसत आहे.
प्रकाशचित्र ३
प्रकाशचित्र ४
प्रकाशचित्र ५ बालचमुची धम्माल!
प्रकाशचित्र ६ वेताळेश्वर
प्रकाशचित्र ७
प्रकाशचित्र ८ बुरुजा वरिल तोफ
प्रकाशचित्र ९ गाड्याची तोफ
प्रकाशचित्र १० भावी ट्रेकर्स
प्रकाशचित्र ११ पश्चिमेकडील ढासळलेली तटबंदी
प्रकाशचित्र १२ दिपगृह
प्रकाशचित्र १३ निसर्ग नवल... या दगडावर दुसर्‍या दगडाने ठोकले असता धातू वर आघात झाल्या सारखा ध्वनी ऐकू येतो.
प्रकाशचित्र १४ खांदेरी
प्रकाशचित्र १५ उंदेरीची पश्चिमेकडील बाजू
प्रकाशचित्र १६ उंदेरीची तटबंदी
प्रकाशचित्र १७ उंदेरीची पुर्वेकडील बाजू
प्रकाशचित्र १८ खोल समुद्रातील खांदेरी
प्रकाशचित्र १९
प्रकाशचित्र २० जल्लोष!