Friday, September 20, 2013

Visiting Ladakh - 6

लेह - सार्चू - मनाली - चंदिगढ हा ७५० कि.मी. पेक्षा जास्त असा परतीचा प्रवास होता. त्यामुळे बाकीच्या मेंबर्सनी सपशेल माघार घेतली. संदिप, गिरी, जिप्सी आणि मी असे अकरा पैकी फक्त चार जण परतीच्या प्रवासाला निघालो. चारच मेंबर असल्यामुळे टुर ऑपरेटला INNOVA पाठवण्याची विनंती केली आणि त्याने ती लगेच मान्य केली.

आज आम्हाला लकीची सोबत होती. आम्ही मुंबईचे आहोत हे कळल्यावर स्वारी जाम खुष झाली. शाहरुख, सलमान से मिलना है.. उसके लिए बॉलीवुडमे व्हिलन बनने को भी तैयार है... लकी एकदम जोष मधे सांगत होता.

प्रचि १३३


आजचा लेह ते सार्चु हा प्रवास २५१ कि.मी. चा होता. NH-21 वरुन निघाल्यावर वाटेत शे, थिकसे, कारु करत उपशीला पोहचलो. रुमस्ते गावानंतर पुढे क्याम लुंग्पा दिसतो. त्यापुढे घाट सुरु झाला... घाट संपल्यावर डावीकडे त्सोकारला जाणारा कच्चा रस्ता दिसला. पण वेळे अभावी तिकडे जाणे शक्य नव्हते.

प्रचि १३४


प्रचि १३५


प्रचि १३६


प्रचि १३७


प्रचि १३८


प्रचि १३९


प्रचि १४० 'टांगलान्गला'चा घाट रस्ता.


प्रचि १४१


प्रचि १४२


प्रचि १४३ टांगलान्गला


प्रचि १४४


प्रचि १४५


मनाली लेह रस्त्यावर वाहनांची तुरळक वर्दळ असते... बाकी सगळा सन्नाटा. टांगलान्गला पार केल्या नंतर मुर प्लेन्स दिसू लागले. दोन डोंगरांच्या पठारी भागातुन एक सरळसोट रस्ता जातो.. अगदी F1 च्या Track सारखा..

प्रचि १४६


प्रचि १४७


प्रचि १४८


या रस्त्याच्या दुतर्फा नयनरम्य नजारे बघावयास मिळतात.

प्रचि १४९


प्रचि १५०


प्रचि १५१


प्रचि १५२


मुर प्लेन्सचा रस्ता संपला की समोर अचानक पांगची दरी आवासून उभी असते.

प्रचि १५३


या रस्त्यावरील निसर्गाच्या वैविध्याने डोळे दिपवून गेले. पांगचा घाट उतरुन खाली जेवणासाठी थांबलो.

प्रचि १५४


प्रचि १५५ पांग मधिल पिवळ्या चोचीचे कावळे


जेवुन निघालो... वाटेत फारस कोणीच दिसत नव्हत... एखाद दुसरा मालवाहू ट्रक दिसला तर... बाकी सन्नाटा!!!

प्रचि १५६


प्रचि १५७


संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही १६,५९८ फुटांवरील लाचुलुंगला वर पोहचलो..

प्रचि १५८


लाचुलुंगा उतरायला सुरवात करणार तोच समोरुन एक फॉरच्युनरवाला आला आणि पुढिल रस्त्याची विचारपुस करु लागला. त्याच्या गाडीत काही तरी बिघाड झाला होता आणि त्यामुळे गाडीतील तीन चार मंडळी त्या भयाण वातावरणात तो घाट चढून येत आहेत असे कळले. पुढे दोनशे मिटर वर ती मंडळी आम्हाला भेटली. संदिप आणि मी गाडीतून उतरलो आणि त्या दमलेल्या जिवांना जागा करुन दिली. ड्रायव्हरने त्या अरुंद घाटात युटर्न घेउन त्या मंडळींना वर सोडून आला. त्या मधल्या दहा एक मिनिटांत अनुभवलेली ती भयाण शांतता अक्षरशः अंगावर आली होती. गाडी येई परत पर्यंत हुडहुडी भरली होती.

प्रचि १५९ नकीला


प्रेत्येक 'ला'च्या आजुबाजुला अक्राळ विक्राळ डोंगर रांग पसरलेली असे... ओसाड आणि निर्जन.

प्रचि १६०


प्रचि १६१


प्रचि १६२


आता मात्र त्या निर्जन प्रवासाचा कंटाळा येऊ लागला होता. डोंगर आणि रस्ता बघुन जीव विटला होता.. कधी एकदाचा हा प्रवास संपवतोय असे झाले होते. ड्रायवरकडे चौकशी केली तर त्याचे ठरलेले उत्तर... ''बस अभी आ जायेगा सार्चू"... पण आमचा सार्चूचा सर्च काही केल्या संपत नव्हता. नागमोडी Gata Loops, Whiskey Bridge, Tsarap Chu नदीच्या विस्तिर्ण पात्रा वरिल Elephant Head... सगळंच अद्धुभत होत यात काहीच वाद नाही... पण त्या साठी करावा लागणार प्रवास मात्र थकवणारा होता. सहनशितलेचा अंत पाहणारा होता.

सुर्य अस्ताला जायच्या आधी काही मिनिट आधी आम्ही सार्चूच्या सनड्रॉप कँपवर पोहचलो. गाडी उतरतोय तोच थंडी उंगात शिरु लागली. कस बसं सामान Tent मधे टाकल आणि गरमा गरम चहा पिण्यासाठी बाहेर पडलो खरे... पण बाहेर पडल्यावर मात्र चहा नको पण थंडी आवर अशी अवस्था झाली. जेवणा साठी तुंबुतून परत बाहेर पडायला नको म्हणून चहाच्या खेपेतच जेवणाचाही कार्यक्रम उरकून टाकला. फिदीफिदी

प्रचि १६३


भणभणत्या वार्‍यावर फडफडणार्‍या तंबुत रात्री झोप लागणे अश्यक होते. रात्रभर भणभणारा वारा पहाटे शांत झाला तेव्हा आपसूक झोप लागली. सकाळी उठवल्यावर पाण्यात हात मिळवणी करणे शक्यच नव्हते. तुंबुतून बाहेर डोकावून बघितले.. समोर गरम पाण्याची सोय दिसली. तरिही मनाला आंघोळीचा विचार अजिबात शिवला नाही. मुखमार्जन करुन न्याहरी साठी बाहेर पडलो. वारा कमी असला तरी तापमान ३-४ डिग्रीच्या आसपास होतं. नाष्टा लागे पर्यंत कॅंम्पच्या मालकाशी गप्पागोष्टी सुरु झाल्या. या कँम्पची सगळी रसद मनाली वरुन येते. कामगार नेपाळ, तिबेट नाहितर बिहार मधुन येतात. या भागात प्रथम येणारा कामगार हमखास आजारी पडतो. एकदा का या विचित्र हवामानाची सवय झाली की मग कामाला लागतो.

प्रचि १६४


प्रचि १६५


नाष्ट्याला नुकतेच तयार केलेले थंडगार पोहे होते. ब्रेड साठी गरम करुन ठेवलेल बटर ब्रेड वर घेताच क्षणी त्याचा खडा बनत होता. न्याहरी आटोपताच सगळ्यांनी तिथून पळ काढला. गाडीत स्वतःला कोंडून घेतल्यावर बरं वाटलं.

प्रचि १६६


समोर ५०४५ मि. उंचीवरचा 'बारालाचा'ला डोक्यावर शुभ्र मलमलीत टोपी चढवुन आमची वाट पहात बसला होता.

प्रचि १६७


प्रचि १६८


प्रचि १६९


हा पहाडेश्वर तर चक्क गळ्या भोवती मलफर गुंडाळुन ध्यानस्त बसला होता.

प्रचि १७०


प्रचि १७१


प्रचि १७२


प्रचि १७३ सुरजताल


प्रचि १७४


प्रचि १७५


प्रचि १७६


प्रचि १७८


प्रचि १७९


प्रचि १८०


दगड मातीच्या डोंगराची जरब आता कमी झाली होती. खुरटी झुडपे डोंगर माथ्यावर टकामका बघत होती.

प्रचि १८१


प्रचि १८२


प्रचि १८३


प्रचि १८४


निसर्गाच आपसूक बदलणार रुप मनमोहक होतं. त्याचा आनंद घेत जिप्साच्या वाटेवर दिपक ताल पार केला. आता त्सो आणि ला चे रुपांतर ताल आणि पास मधे झाले होते. केलाँगच्या पुढे 'चंद्र-भागा'चा संगम पाहिला. टंडीला गाडीत डिझेल भरुन पुढे निघालो.

प्रचि १८५


मनाली ते लेह या रस्त्यावरचा टंडी हा शेवटचा पेट्रोल पंप, या नंतरचा पेट्रोल पंप थेट लेह मधेच ३६५ कि.मी. वर... त्यामुळे इथे जर पेट्रोल भरुन घेतले नाही तर पुढे ठणठणगोपाळा करत बसण्या शिवाय दुसरा मार्ग नाही.
वाटेत हिमाचल प्रदेश परिवहनच्या बसेसची रहदारी दिसू लागली आणि रोहतांग जवळ आल्याची जाणीव झाली.

प्रचि १८६


प्रचि १८७


प्रचि १८८


प्रचि १८९


सिसु नंतर पुढे डाम्फुग आणि ग्राफु गावं मागे टाकत रोहतांगच्या दिशेने निघालो.. १३,०५० फुट उंचीवरचा रोहतांग पास धुक्यात हरवलेला होता.

प्रचि १९०


रोहतांग पास पार करुन हिमाचल प्रदेश मधे दाखल झालो. रोहतांगचा रहाला धबधब्यावर पर्यटकांची गर्दी ओसंडुन वहात होती. या पुढचा मार्ग अगदी बिकट होता. सततच्या पावसामुळे घाटातील अरुंद रस्ता चिखलमय झाला होता. त्यातुन गाडी चालवण म्हणजे फार मोठ कसब होतं.

प्रचि १९१


प्रचि १९२


प्रचि १९३


प्रचि १९४


प्रचि १९५


प्रचि १९६


प्रचि १९७


प्रचि १९८


घाटातुन दिसणार गुलाबा कँम्पची दॄष्ये.. इथे पॅरॅग्लाइडींगचा बेस कॅम्प आहे. इथल्या शालिमार हॉटेल मधला चणा मसालाची रुचकर चव कायम लक्षात राहिल.

प्रचि १९९


प्रचि २००


प्रचि २०१


जेवण आटोपुन एक तासात हॉटेल मार्बल व्ह्यु वर पोहचलो. कालच्या लेह ते सार्चु प्रवासा पेक्षा आजचा सार्चु ते मनाली हा प्रवास खुपच चांगला होता. इतके दिवस हिरवळीच्या विरहात सुकलेले डोळे आज पुन्हा मनालीतील हिरवळ पाहुन तृप्त झाले.

प्रचि २०२


प्रचि २०३


हॉटेलच्या जवळच हिडिंबा मातेच मंदिर होतं.. गिरिच्या आग्रहस्ताव तिकडे भेट देण्यात आली.

प्रचि २०४


प्रचि २०५


प्रचि २०६


संध्याकाळी मानालीच्या बाजारात फेरफटका मारुन खिसे हलके केले. मार्बल व्ह्यु मधिल जेवण चवदार होते. श्रीनगर नंतर थेट मनालीला आल्यावरच जिभेचे हवे ते चोचले पुरवण्याचे समाधान मिळाले. कारगील ते सार्चुच्या दरम्यान जे काय जेवायचो ते केवळ उदरभरण असायचे.

११ ऑगस्ट टुरचा शेवट...

शेवटच्या दिवशी २९० कि.मी.चा मनाली ते चंदिगढ प्रवास करुन चंदिगढ वरुन संध्याकाळी ६.३०चे परतीचे फ्लाईट पकडायचे होते. मनाली ते चंदिगढ प्रवासाठी १० ते १२ तास लागू शकतात असे ऐकले होते. त्यामुळे आम्ही सकाळी सहालाच निघायचा निर्णय घेतला.

प्रचि २०७


रात्रभर रिपरिपणार्‍या पावसामुळे वातावरणात कुंदपणा भरुन राहिला होता. अश्या वेळी लोणावळ्याची याद न येईल तरच नवल! आजच्या INNOVAचा सारथी धरमपाजीची NH-21 वरुन सुसाट निघाली.. ब्यास नदीला आंजारत गोंजारत जाणारा NH-21चा रस्ता मला फारच आवडला.

प्रचि २०८


एव्हाना धरमपाजीची टकळी सुरु झाली होती. आणि त्याच्या जोडीला गिरिची टाळी. मग काय सरफचंद ते शिमला करार सगळच निकालात निघाल. फिदीफिदी

प्रचि २०९


धरमपाजीच्या कृपेने (की इच्छेने) एका वळणावर सरफचंद खरेदी झाली. कुल्लू पार केल्यावर ब्यासच्या तिरावरील एका धाब्यावर सकाळचा नाष्टा झाला.

प्रचि २१० डोंगराच्या कुशीत विसावलेल... कुल्लू


मंडी, पालमपुर मागे टाकुन टुर मधल्या शेवटच्या घाटात स्वार घाटात पोहचलो. स्वार घाटाच्या उजविकडे अस्ताव्यस्त पसरलेला गोबिंद सागर जलाशय दिसला. जलाशयाच्या पश्चिमेला बाक्रानांगल धरण आहे. वेळे अभावी आम्ही तिकडे भेट देण्याचे टाळले.

प्रचि २११


प्रचि २१२


प्रचि २१३


प्रचि २१४


प्रचि २१५


गेले दहा दिवस पंख्या शिवाय रहाण्याची सवय झाली होती. चंदिगढ मधे दाखल होताच उन्हाळा जाणवू लागला. चंदिगढच्या रस्त्यावर जागोजागी लंगर लागले होते.

संध्याकाळची फ्लाईट पकडण्यासाठी मनाली वरुन लवकर निघालो होतो.. त्यामुळे वेळे आधीच आम्ही चंदिगडला पोहचलो होतो. हातात चार तास असताना काय करायचे हा प्रश्ण होता. मग काय 'हवेली'त भरपेट जेवुन आमच्या अविस्मरणिय लडाख टुरची सांगता केली.

प्रचि २१६


धन्यवाद स्मित