Friday, August 23, 2013

Visiting Ladakh - 2

दिवस तिसरा... नामिकला, फोटुला

श्रीनगर ते कारगीलचा प्रवास २०४ कि.मी.चा होता. त्या मानाने आजचा कारगील ते लेह हा २३४ कि.मी.चा प्रवास थोडा जास्त होता. वाटेत नामिकला आणि फतुला या दोन खिंडी पार करायच्या होत्या. कालच्या रस्त्याचा ताजा अनुभव लक्षात घेता, आम्ही लेह कडे लवकर प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला.
NH-1 वर वसलेल कारगील हे एक टुमदार गाव.. गावाला वळसा घालुन आमची गाडी एका टेकाडावर आली. द्रास नदीच्या खळखळाटाने जागं होणार्‍या कारगीलचा सुंदर देखावा डोळ्यात साठवुन आम्ही पुढे निघालो.

प्रचि ३१


प्रचि ३२


प्रचि ३३


प्रचि ३४


कारगील पासून साधारण ४० कि.मी. वर मुलबेख गावात मैत्रेय बुद्धाच अखंड पाषाणात कोरललं शिल्प आहे.

प्रचि ३५


मैत्रेय बुद्धाच दर्शन घेऊन नमिकाला कडे निघालो. या मार्गातील चित्तवेधक देखाव्यांवरुन नजर हटत नव्हती.

प्रचि ३६


प्रचि ३७


प्रचि ३८


प्रचि ३९


प्रचि ४०


प्रचि ४१


प्रचि ४२


प्रचि ४३


प्रचि ४४


प्रचि ४५


प्रचि ४६


प्रचि ४७


प्रचि ४८


प्रचि ४९


प्रचि ५०


फतुला खिंड पार करुन आम्ही लामायारु मॉनेस्ट्री जवळ आलो. मुलबेख पासुन ६० कि.मी. वर लामायारु आहे.

प्रचि ५१


प्रचि ५२ मुन लॅण्ड


प्रचि ५३


प्रचि ५४


प्रचि ५५


प्रचि ५६ रंगसंगती मधिल वैविध्य


प्रचि ५७ मॅग्नेटिक हिल


वरिल प्रकाशचित्रात रस्त्याला जो उतार दिसातोय तिथे जाऊन गाडी बंद करायची. तेथील चुंबकीय शक्तीच्या प्रभावामुळे न्युट्रल वर ठेवलेली गाडी आपोआप मागे खेचली जाते.

प्रचि ५८


आम्ही लेख मधे दाखल होताच निसर्गातील बदल जाणवू लागला.

प्रचि ५९


लेहला हॉटेल स्नोलायन मधे आमचा चार दिवस मुक्काम होता. हॉटेल मालक सोनमने आम्हाला जराही उसंत न देता सगळं बॅगेज रिसेप्शन वर ठेवायला लाऊन.. थेट हॉटेलच्या मागिल बाजुस पिटाळले. छोटेखानी हॉटेलच्या मागे सुंदर बागीचा तयार केलेला होता आणि बगीच्यात बाफाळता चहा आमची वाट पहात होता. या अनपेक्षीत पाहुणचाराने मन भारावुन गेले.

प्रचि ६० छायाचित्रकार जिवेश आणि अमित


प्रचि ६१ हॉटेल स्नोलायनच्या गच्चीवरुन दिसणारा सुर्यास्त

 

Tuesday, August 20, 2013

Visiting Ladakh -1

खुप वर्षां पासून मनी बाळगलेला एखादा मनसुबा जेव्हा कधी तडीस जातो.. तेव्हा मिळणारा आनंद शब्दात उतरवणे फार कठीण काम असते. जेव्हा केव्हा हिमालयीन ट्रेकिंगचा विषय निघायचा तेव्हा उसासे टाकण्या खेरीज मला काहिच करता येत नसे. अश्यातच एके दिवशी मायबोलीवर जिप्सी सारखा भटक्या भेटतो काय आणि हिमालयाच्याही पार... थेट लेह-लडाखची सफर घडते काय.. सगळच स्वप्नवत!

मला वाटतं भारतात अ‍ॅड्वेंचर्स टुर्स मधे लेह-लडाखच स्थान अग्रस्थानी असाव. त्यात ब्लॉग्स आणि प्रकाशचित्र लेह-लडाख विषयीच्या उत्सुकतेत दिवसेंन दिवस भर घालतच होते. कसं आणि कोणा सोबत जायच हाच मुळात प्रश्ण होता. लेहला जाण्याचा जिप्सीचा पहिला प्रयत्न हुकला होता. हार न मानता जिप्सीचे प्रयन्त सुरुच होते. सुदैवाने मला ही संधी साधण्याचा योग जुळुन आला. जिप्सीच्या साथीने आम्ही श्रीनगर - कारगिल - लेह - नुब्रा व्हॅली - पँगॉग स्तो - सार्चु - मनाली - चंदिगड असा १० दिवसांचा भरगच्च प्लॅन तयार केला. एक.. एक से भले दो... असे करत एकूण ११ मेंबर्स बॅग पॅक करुन २ ऑगस्ट २०१३ची वाट पाहू लागलो.

१ ऑगस्टला रात्री साडे अकराच्या सुमारास जिप्सीचा फोन..
"इंद्रा... कळलं काय?"
काय झालं?
"कारगिलला लॅन्डस्लाईड झालयं... रस्ता बंद झाला आहे."
मनात म्हंटलं सहा महिन्यांच्या प्लॅनिंगवर पाणी फिरणार की काय?? जिप्सीला धीर दिला.. 'कोणाला सांगू नकोस.. उद्या थेट एअरपोर्टवर भेटू".

सकाळी एअरपोर्टवर पोहचल्यावर मोजक्याच जणांना ही खबर सांगितली... म्हंटल जो होगा देखा जायेगा... आधी 'मिशन काश्मिर'.

श्रीनगरला पोहचलो खरं पण इथे ही मुंबईचा सखा सोबतीला आला होता. पाऊस आणि हवेतील गारवा आमच्या स्वागताला हजर होते.

श्रीनगर मधिल पहिला दिवस केवळ आरामाचा होता. दल लेकच्या रॉयल पॅलेस वर सामान टाकून आम्ही शिकार्‍यातून सफारीला निघालो. एव्हाना आभाळ स्वच्छ झालं होतं. वातावरणातील या बदलाने सगळे छायाचित्रकार सुखावून गेले.

प्रचि १


प्रचि २


प्रचि ३


शिकारा मालक आम्हाला शॉपिंग टुर करविण्यातच धन्यता मानत होता. त्याला जबरदस्तीने परतीच्या प्रवासात दल लेकचा परिसर दाखवण्यास मजबुर कराव लागलं.

प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७ देश तैसा वेश...


हाऊस बोटच्या मालकाने रात्रीच्या जेवणाची उत्तम सोय केली होती. हे हाऊस बोट प्रकरण मला फारच आवडलं. जल्ला सम्दं पाण्यामंदी... फिदीफिदी

श्रीनगरची ही धावती भेटी एकंदरीत सुखावह होती. खड्यांचे मार्केटिंग करणारा मकबुल असो वा हाऊस बोटचा मालक वा आमचा टुर ऑपरेटर.. सगळेच कर्तव्य तत्पर आणि मनमिळावू.. मितभाषी स्मित

प्रचि ८


***
दिवस दुसरा... झोझीला

रॉयल पॅलेसचा निरोप घेऊन आम्ही सोनमर्गकडे कूच केली. वाटेतील सदाबहार निसर्ग डोळे तृप्त आणि मन प्रसन्न करत होता. रस्त्याच्या उजव्या बाजूच्या हिरव्याकंच पहाडातून वर डोकं काढणारे हिमनग, सोनमर्ग आल्याची वर्दी देत होते.

प्रचि ९


प्रचि १०


प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३


प्रचि १४


सोनमर्गला हिमशिखरां वर जाण्याच आमिष खुणावत होतं. पण काही केल्या आज कारगिल गाठायचच, असा आम्ही चंग बांधला होता. त्यात आनंदाची बातमी कळाली... कारगीलचा रस्ता सुरु झाला आहे. दोन दिवसापुर्वी झालेल्या ढगफुटी मुळे NH-1 ची खुपच हानी झाली होती. त्यामुळे आम्ही जास्त वेळ न काढता कारगील कडे प्रस्थान केले.

प्रचि १५


प्रचि १६


प्रचि १७


वाटेत अमरनाथ बेस कॅम्पचा देखावा बघत आम्ही झोझीलाच्या लोअर रुटने पुढे निघालो. उजविकडे झोझीला खिंड १ कि.मी. वर दिसत होती. पण तिथ पर्यंत पोहचण्याचा मार्ग मात्र दिसत नव्हता. आमच्या टेंपो ट्रॅव्हलरचा ड्रायवर 'नाझिर' गाडी साईडिंगला लाऊन धूर काढू लागला.
'कितना टाईम लगेगा?'
"बस दो-चार घंटा"... असं मोघम उत्तर आलं.

प्रचि १८


प्रचि १९ अप्पर आणि लोअर रुट


प्रचि २०


नाझिर आम्हाला सोनमर्गला जेवण करण्याचा आग्रह का करत होता त्याच कोड इथे आल्यावर उलगडलं. दुपारच्या टळटळीत उन्हात आमच्यातले हौशी ट्रॅफिक कंट्रोलर पुढे गेले. रस्त्यावरच्या धुळीत पायाचा घोटा पुर्ण रुतत होता. गाडी शेजारुन एखादी बाईक पुढे गेली तर सगळी धुळ गाडीत, अश्या बिकट अवस्थेत सापडलो होतो. बाहेर तळपतं ऊन, हवेत गारवा आणि रस्त्यावरील धुळ अश्या विचित्र मिश्रणाचा परिणाम नाजुक लोकांच्या प्रकृती वर त्वरित दिसु लागला.

प्रचि २१ मागच्या दरीत अमरनाथ बेस कॅम्प आहे.


प्रचि २२ झो-झी-ला


शेवटी चार तासाच्या झटापटी नंतर आम्ही झोझीला पार केला. द्रासला पोहचे पर्यंत हिरव्या निसर्गाने अक्षरशः कात टाकली होती.

प्रचि २३


प्रचि २४


प्रचि २५


प्रचि २६


प्रचि २७


प्रचि २८


प्रचि २९


टायगर हिल, पॉईन्ट ५१४० (कॅप्टन विक्रम बत्रा पॉईन्ट), टोलोलींग अशी एक एक रणशिखरे मागे टाकत संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही द्रासला पोहचलो तेव्हा पोटातील कावळ्यांनी राम म्हंटले होते. गरमागरम मॅगी आणि आलू पराठे पोटात गेल्यावर थकलेले जीव स्थिरस्थावर झाले.

द्रास गावाच्या पुढचा रस्ता अगदी चकाचक आहे. गावा बाहेर कारगीलच्या युद्धात एका रात्रीत आर्मीच्या जवानांनी उभी केलेली कंपाऊंड वॉल नाझिरने दाखवली. नाझिर त्या गुळगुळीत रस्त्यावरुन सुसाट निघाला होता. मात्र झोझीला मुळे झालेला उशिर आणि पुढे कारगीलच्या रस्त्यावर भूसंख्लनचा धोका या विचार चक्रात नाझिरने एक तिर्थ क्षेत्र चुकवले. अरेरेत्या संधीप्रकाशात कारगील वॉर मेमोरीयल मधे अभिमानाने फडकणार्‍या
आपल्या तिरंग्याला आम्ही धावत्या गाडीतूनच मानवंदना देऊ शकलो.

प्रचि ३०


द्रास ते कारगील ६० कि.मी. अंतर साधारण दोन तासात गाठता आलं असतं... पण दोनच दिवसांपुर्वी झालेल्या भुसंख्लनमुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेले होते. काही ठिकाणी अंधारात दगद, मातीच्या ढिगार्‍यांतून मार्ग काढत नाझिर गाडी हाकत होता. रात्री नऊला हॉटेल गाठले तेव्हा कारगील बंद झाले होते.

आपल्याकडे शहरात एखादी नैसर्गिक आपत्ती ओढावली तर केवढा गाजावाजा होतो. पण इथे कसला ही गाजावाजा न करता आर्मीचे जवान दोन दिवसात रस्ता पुर्ववत करतात. या खर्‍याखुर्‍या हिरोंना मनापासून सलाम!

*********