Wednesday, April 24, 2013

प्रभाती...

कोकणात जायच म्हटलं की आमचं मुक्कामाच पहिलं आणि आवडत ठिकाण म्हणजे सह्यरांगेच्या पायथ्याशी वसलेल 'पोलादपूर'.. स्वागताला खुद्द प्रतापगड आपल्या दोन्ही बाह्या पसरुन आलिंगन देण्यास सज्ज असतो.. पुढे कशेडी घाटात शिरताना मधु मकरंदगड टोपी वर करुन अभिवादन करताना दिसतो... घाट उतरून कोकण रेल्वेच्या सोबतीने खेडच्या दिशेने सुटल्यावर डावीकडे महिपतगड आणि रसागळगड लक्ष वेधुन घेतात.




दर वेळेला कोकण प्रवासातले हे सोबती मला नव्याने भेटतात आणि मंत्रमुग्ध करतात... पुर्वेला सह्यरांगेच्या पार्श्वभुमीवर त्या दिनकराने मांडलेला सुर्योदयाचा पसारा बघण्याचा आनंद शब्दात वर्णन करणे कठिण... म्हणून हे काही निवडक प्रचि केवळ तुमच्या साठी...


प्रकाशचित्र १:  चैत्रातील विनायक चतुर्थीची चंद्रकोर

प्रकाशचित्र २


प्रकाशचित्र ३


प्रकाशचित्र ४


प्रकाशचित्र ५


प्रकाशचित्र ६


प्रकाशचित्र ७


प्रकाशचित्र ८


प्रकाशचित्र ९


प्रकाशचित्र १०


प्रकाशचित्र ११


प्रकाशचित्र १२:  प्रतापगड