Wednesday, June 27, 2012

परळी - सप्तर्षी





२००७ मधे वासोट्याला जाताना वाटेत अजिंक्यतारा आणि सज्जनगडच्या नाका खालून गेलो होतो. तेव्हा कधी तरी परत यायचेच हा मनसुबा मनात पक्का केला होता. तो योग जुळून यायला ५ वर्ष वाट पहावि लागली. गेल्याच आठवड्यात एका लग्ना निमित्त सातार्‍याला जाणे झाले. शनिवारी सकाळी पुण्या वरुन निघालो तेव्हा वाटेत सिंहगडाचे दर्शन झाले.











खेड-शिवापूरला दुपारी पिठलं-भाकरीच जेवण करुन निघालो ते थेट सातार्‍याच्या दिशेने. पहिलं लक्ष अजिंक्यतारा होतं... पण ट्रॅफिक हवालदारच्या कृपेन समर्थांच्या सज्जनगडावर पोहचलो.







गडावरुन दिसणारा नजारा...





गडाचे प्रवेशद्वार





महाद्वार











पुर्वाभिमुख महाद्वाराच्या उजविकडे प्रवेश करताच एक शिलालेख पहावयास मिळते. त्याचा अर्थ पुढिल प्रमाणे... १. ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवीत आहे. २. तू विंवंचना दूर होण्याचे स्थान युक्त आहेस, परंतु पुन्हा विवंचना युक्त आहेस. ३. तुझ्या पासून सर्व विवंचना दूर होतात. ४. सर्व फुलांना प्रफुल्लित करीत आहे.







आश्वालायन ऋषींचे वास्तव्य असलेला या गडाची उभारणी राज भोज ह्याने ११व्या शतकात केली. गडाच्या पायथ्याशी परळी गाव होते, त्या वरुन गडाला परळीचा किल्ला अशी ओळख मिळाली. महारांजाच्या विनंती वरून समर्थ रामदास कायमस्वरूपी वास्तव्यास गडावर आले तेव्हा गडाचे नामकरण करण्यात आले 'सज्जनगड'. समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला बर्‍याच संकटांना समोरे जावे लागले. स्वराज्याचे युवराज दिलेर भेटी साठी गेले ते येथूनच...



घोड्यांची पाण्याची व्यवस्था बघणारे 'घोडाळे तळे'





गडावरिल पिण्याच्या पाण्याचे बांधिव 'सोनाळे तळे'









पेठेतल्या मारुतीच मंदिर





मंदिरा समोरील 'श्रीधर कुटी' नावाचा आश्रम





समर्थांचा मठ आणि शेजघर...





शेजघरात सर्मथांची समाधी आणि समर्थांच्या दैनंदिन वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. मठाच्या उजविकडे श्रीराम मंदिर आहे तर मागे धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. तेथून दिसणारा उम्रोडी (उर्वशी) नदिचा नजारा कॅमेर्‍यात कैद करुन मागे फिरलो.



श्रीराम मंदिर















रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या धर्मशाळेतून भरुन घेतल्या आणि घोडाळ्या तळ्या डावीकडून आंग्लाई देवीच्या मंदिराकडे गेलो.





तळ्याच्या मागे दिसणार्‍या इमारतीचे अवशेष.





कास, बामणोलीला जाणारा रस्ता...





गडावरील नक्षीकाम





महाद्वारातून दिसणारा अजिंक्यतारा





दोन तासात पुर्ण गड फिरून झाला तेव्हा ४ वाजले होते. ढगाळ वातावरणमुळे उन्हाचा फारचा त्रास जाणवत नव्हता आणि समोर अजिंक्यतारा खुणावत होता. मग काय... अर्ध्या तासात अजिंक्यतार्‍याच्या कमानी समोर...











सातारचा 'सप्तर्षी' म्हणून 'अजिंक्यतारा' ओळखला जातो. गडावरुन पायथ्याचे सातारा शहराचे विहंगम दृष्य दिसते.











कास-बामणोली डोंगरधारेवरील अग्नेय कडिल शेवटचे टोक म्हणजे 'अजिंक्यतारा'... गडाच्या पुर्वेला नांदगिरीचा 'कल्याणगड' आणि 'चंदन-वंदन' ही जोड गोळी दिसते... तर पश्चिमेला 'सज्जनगड' दिसतो.





राजगड, रायगड, जिंजी नंतरची मराठ्यांच्या चौथ्या राजधानीचा मान मिळाला तो अजिंक्यतार्‍याला.. १७०८ मधे शाहुने याच किल्ल्यावर स्वतःस राज्याभिषेक करुन घेतला.



दरवाजातून पुढे गेल्यावर उजविकडे महादेवाचे मंदिर दिसते.









मंगळादेवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत ताराबाईचा ढासळेला राजवाडा दिसतो.















गडावर तीन तळी आहेत पैकी दोन आटलेली आहेत.





भटकंती दरम्यान गडावरील इमारतींचे भग्नावशेष नजरेस पडले...









एव्हाना नारायण सुवे माघारी निघाले होते... परतीच्या वाटेवर टिपलेली काही चौकटी...

























No comments:

Post a Comment