Tuesday, June 12, 2012

वसई किल्ला

पश्चिम किनारपट्टी वरिल पोर्तुगिजांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी मराठे १७३७ मधे कल्याण मार्गे उत्तर कोकणात उतरले. उत्तर ते दक्षिण कोकण परिसरात वसईचा किल्ला हा भौगोलिक दृष्ट्या फार महत्वाचा होता. पश्चिम किनारपट्टी वरिल मुंबई ते दमण पर्यंतच्या परिसरावर या किल्ल्या मुळे वचक ठेवणे शक्य होते. वसई बंदरात उतरलेला माल कल्याण मार्गे जुन्नरला जात असे, त्यामुळे या किल्ल्याला व्यापारी महत्वही प्रात्प झाले होते. १७३९ मधे चिमाजी आप्पांच्या मराठी सैन्याने पराक्रमाची शर्थ करुन वसईचा किल्ला काबिज केला. चिमाजी आप्पांनी श्री वज्रेश्वरी देवीला नवस केला, की जर तुझ्या कृपेमुळे मी किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधिन. भल्या पहाटे गेल्यामुळे देवी दर्शन होऊ शकले नाही. प्रचि १ वज्रेश्वरी मंदिर प्रचि २ प्रवेशद्वार प्रचि ३ प्रचि ४ प्रचि ५ प्रचि ६ प्रार्थना मंडप किल्ल्याच्या बहुतांश बांधकामावर पोर्तुगिजांची छाप दिसते. दशकोनी आकाराच्या किल्ल्यावर प्रत्येक कोपर्‍य़ावर एक बुरुज असून तटबंदी मजबूत स्थीतीत आहे. किल्ल्यातील उंच आणि रुंद बुरुजांना बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. एक समुद्राकडून तर दुसरा जमिनीवरून आहे. प्रचि ७ प्रचि ८ प्रचि ९ प्रचि १० प्रचि ११ प्रचि १२ प्रचि १३ प्रचि १४ प्रचि १५ प्रचि १६ प्रचि १७ तटबंदी मधिल जंग्या प्रचि १८ प्रचि १९ वसईची खाडी प्रचि २० चिमाजी आप्पांचे स्मारक पश्विम रेल्वेच्या वसई स्टेशनवरुन एस्टी, रिक्षा किंवा खाजगी वाहनाने १५ मिनिटांत किल्ल्या पर्यंत पोहचता येते. पुर्ण किल्ला फिरायला तीन - चार तासांचा अवधी हाताशी ठेवावा.

No comments:

Post a Comment